Call 70 3001 86 86

Follow us

Kanbai Mata Utsav Nandurbar 2023

Kanbai Mata Utsav Nandurbar 2023

Kanbai Mata Utsav Nandurbar 2023

Kanbai Mata Utsav Nandurbar 2023 खान्देशातील सर्वात प्रसिद्ध असे ग्रामदैवत म्हणून कानबाई मातेचा लौकिक आहे. अत्यतं लोभस आणि साधं असं हे दैवत आहे. या कानबाई मातेची फक्त तीनच मंदिर आहेत. निसर्गपूरक असा हा कानबाईचा सण खान्देशात श्रावण महिन्यात नागपंचमी नंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. पंधरा दिवस आधी घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्याची स्वच्छता या सणानिमित्त केली जाते, अत्यंत पवित्र आणि स्वच्छ वातावरणात सुहासिनी मातेची स्थापना करतात. कानबाई मातेची स्थापना ज्या ठिकाणी केली जाते तिथे फुलमाळानी सजवून छोटाच गाभारा आणि मंडप तयार केला जातो. यावेळी आकर्षक अशी विदुत रोषणाई मनमोहून घेते. तांब्यावर नारळ ठेवलं जात त्या नारळाला नथ, डोळे लावून कानबाई मातेचे रूप दिले जाते. त्याला अलंकारांनी सजवले जाते. मातेचं हे रूप लोभस आणि देखणं राहत. आपलंस वाटणार कानबाई मातेचे हे रूप पाहण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्य आवर्जून उपस्थति राहतो. १०७ प्रकारच्या वनस्पतीं आणि सात नद्यांचे पाणी आणून कानबाईचे पूजा सजवली जाते. रविवारी स्थापन केलेल्या कानबाई मातेला सोमवारी मोठ्या उत्साहात पारंपारिक खानदेशी नृत्य फुगडी खेळत निरोप देण्यात आला श्रावण सरींच्या हजेरीने दरवर्षी कानबाई मातेला निरोप दिला जातो मात्र यावर्षी पावसाने दडी मारल्याने सर्वांची नजर पावसाकडे लागू नये आणि खानदेशातील कष्टकरी शेतकऱ्याने आता कानबाई मातेला पावसासाठी साकडे घातले आहे.

 

 
Tags:
No Comments

Post A Comment

×
Open chat