16 Mar Kathi Holi Nandurbar
Kathi Holi Nandurbar
काठी येथील राजवाडी होळी
शेकडो वर्षांची परंपरा असलेली सातपुड्यातील राज संंस्थानची ओळख असलेली अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथील राजवाडी होळी उत्साहात साजरी होणार आहे. काठी येथील या राजवाडी होळीला सुमारे ७७६ वर्षांची परंपरा असून ग्रामस्थ व संस्थानाच्या वारसदारांनी ही परंपरा टिकून ठेवली आहे. काठी येथील होळीच्या उत्सवाने सातपुडा वासीयांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे. काठी येथे राजवाडी होळीचा उत्सव साजरा करण्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. काठी संस्थानचे वारसदार पृथ्वीसिंह पाडवी, महेंद्रसिंह पाडवी व काठी येथील ग्रामस्थांनी ही परंपरा अविरतपणे जोपासली आहे. या होळीच्या नियोजनासाठी काठी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच स्नेहा पाडवी तसेच गावातील ग्रामस्थ हे परिश्रम घेत आहेत.
No Comments