Call 70 3001 86 86

Follow us

Transforming Lives An Initiative to Educate Begging Community by Inqalab Foundation

Transforming Lives An Initiative to Educate Begging Community by Inqalab Foundation

Transforming Lives An Initiative to Educate Begging Community by Inqalab Foundation

शहादा शहराच्या एका कोपऱ्यात असलेली मांगरवाडी वस्ती या वस्तीत कुणीच शिक्षण घेतलेले नाही त्यामुळे शिक्षणाचा दूर दूर पर्यंत संबंध नाही घरातील सदस्यांप्रमाणेच इथली लहान मुलं पण कचरा वेचून आणि भीक मागून आपला उदरनिर्वाह करतात इन्कलाब फाउंडेशन च्या सामाजिक उपक्रमांतर्गत या वस्तीत कार्यक्रम झाला आणि इथलं वास्तव त्यांचा समोर आलं या वस्तीत असलेल्या 30 ते 40 मुलांना शिक्षणाचा प्रवाहात आणण्याचा निर्धार इन्कलाब फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केला आणि सुरू झाला या ठिकाणचा मुलांच्या जीवनात शिक्षणाचा प्रवास.

प्रत्येक शहरात आणि गावाच्या कोपऱ्याला भीक मागून आणि कचरा वेचून जीवन जगणाऱ्या मांगरवाडी ची वस्ती असते त्यांच्या पिढ्यापिढ्या शिक्षणाचा संबंध आलेला नाही अशाच वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लहान मुलांच्या कुठल्याही प्रकारची कागदपत्र नसल्याने त्यांच्या शाळेतही प्रवेश होत नाही त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणेच ते कचरा वेचायला जाणं आणि शहरभर फिरून भीक मागून जीवन जगणं हा त्यांचा नित्य नियम मात्र घरात कोणी शिकलेला नसल्यामुळे शिक्षणाचाही महत्व माहीत नाही. मात्र आता इन्कलाब फाउंडेशन ने त्यांच्या परिसरात मुलांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतल्याने पालकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येते…

Transforming Lives An Initiative to Educate Begging Community by Inqalab Foundation

दिवसभर आई-वडिलांसोबत कचरा वेचायला जाणं किंवा भीक मागायला जाणे या चिमुकल्यांच्या जीवनातला नित्यक्रम मात्र इन्कलाब फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले आहे. जे हात कचरा वेचण्यासाठी दिवसभर राबत होते ते हात आता पाटी पेन्सिल वर शिक्षणाचे धडे गिरवत आहेत आपल्याला लिहिता वाचता यायला लागल्याचे समाधान या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर पाहिल्यानंतर आपल्याला समजेल…

शहरातील मांजरवाडी परिसरात फाउंडेशन च्या वतीने सामाजिक कार्यक्रम घेण्यात आला होता त्यानंतर या ठिकाणची परिस्थिती त्यांच्या लक्षात आली घरात कोणी शिकलेले नसल्याने या विद्यार्थ्यांचे कुठलेही कागदपत्र न होते त्यांचे आधार कार्ड जन्म दाखला यास इतर कागदपत्र इन्कलाब फाउंडेशनचा सामाजिक कार्यकर्त्यांनी तयार केली त्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळवून दिला मात्र गोष्ट प्रवेश मिळवून देण्यावर थांबणार नव्हती कारण की पिढ्यांना पिढ्या शिक्षणाशी संबंध नसलेल्या समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मग इन्कलाब फाउंडेशनच्या नवदुर्गा या लढ्यात पुढे आल्यात मग रोज सायंकाळी यांच्या वस्तीतच त्यांची शाळा भरू लागली मुलांना दररोज प्राथमिक शिक्षणाचे धडे दिले जाऊ लागले तीन महिन्यात या मुलांची शैक्षणिक प्रगती इतकी आहे की ते आता लिहू शकता वाचू शकता आणि शाळेतल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच ते शैक्षणिक प्रगती करत आहेत

एकीकडे सरकारच्या अनेक योजना आहेत शिक्षणासाठी शिक्षणा हक्काचा कायदा हे मात्र आजही शहरी भागातील अनेक मुलांपर्यंत आणि समाजापर्यंत शिक्षण पोहोचू शकत नाही मात्र इन्कलाब फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे.

No Comments

Post A Comment

×
Open chat