12 Aug राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखण्याचे आवाहन
नंदुरबार : स्वातंत्र्य दिन साजरा करताना वैयक्तिकरित्या वापरण्यात येणाऱ्या राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखला जाईल याची दक्षता नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.
जनतेच्या वैयक्तीक वापरासाठी छोट्या राष्ट्रध्वजाचा उपयोग करण्यात यावा. राष्ट्रध्वज रस्त्यावर वा अन्य ठिकाणी टाकण्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी. राष्ट्रध्वज खराब झाले असतील तर त्याचा योग्य मान राखून ध्वज संहितेतील तरतूदीनुसार नष्ट करण्याची कार्यवाही करण्यात यावी.
अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज विक्रीस प्रतिबंध करावा. अशी विक्री होताना आढळल्यास संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करावे. जाणीवपूर्वक राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंधक कायदा 1971 नुसार कार्यवाही करावी. सर्व शासकीय यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था आणि महामंडळांनी प्लॅस्टिक ध्वजाच्या वापरास पायबंद घालावा असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
No Comments