खान्देश भागातील आगामी कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम किंवा विशेष इव्हेंट्सची माहिती असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा. सदर माहिती आम्ही आमच्या वेबसाइटवर अपडेट करू. +91 7030018686
Logo

Police take strict action against nylon manja in Nandurbar district | Dial 112 Appeal

Nandurbar IG Jan 6, 2026
Police take strict action against nylon manja in Nandurbar district | Dial 112 Appeal

नंदुरबार जिल्ह्यात नायलॉन मांजाविरोधात पोलिसांचा कडक ॲक्शन मोड | Dial 112 Appeal

महाराष्ट्र राज्यात नायलॉन मांजावर पूर्णतः बंदी असतानाही नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी त्याची अवैध विक्री व वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर नंदुरबार पोलिसांनी नायलॉन मांजाविरोधात कडक कारवाईचा इशारा दिला असून, दोषींवर कठोर कायदेशीर पावले उचलली जाणार आहेत. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून अवैधरित्या नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांविरोधात सातत्याने कारवाई सुरू आहे.

नायलॉन मांजाचा वापर टाळावा, यासाठी पोलिसांकडून विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत असून, विशेषतः शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये ही मोहीम प्रभावीपणे राबवली जात आहे. मागील वर्षी नायलॉन मांजामुळे एका बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तपासादरम्यान शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांकडून नायलॉन मांजाचा वापर होत असल्याचे निष्पन्न झाले होते. याच पार्श्वभूमीवर यंदा पोलिसांनी अधिक कठोर भूमिका घेतली आहे.

गेल्या दीड महिन्यांच्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर नायलॉन मांजा जप्त करण्यात आला असून, जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यात कुठेही नायलॉन मांजाची विक्री, साठा किंवा वापर आढळून आल्यास तात्काळ नंदुरबार पोलीस कंट्रोल रूम किंवा डायल ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याप्रकरणी दोषी आढळणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा नंदुरबारचे पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस यांनी दिला आहे.

Home Events Ads Videos News
×
App Icon
Nandurbar IG

Get the App for Latest News

Notifications