खान्देश भागातील आगामी कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम किंवा विशेष इव्हेंट्सची माहिती असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा. सदर माहिती आम्ही आमच्या वेबसाइटवर अपडेट करू. +91 7030018686
Logo

Toranmal Festival to be held in Satpura

Nandurbar IG Jan 8, 2026
Toranmal Festival to be held in Satpura

नंदुरबार जिल्ह्यातील तसेच राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या **तोरणमाळ**च्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्थानिक आदिवासी समाजाच्या रोजगारवाढीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने तोरणमाळ महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.

सातपुड्याच्या कुशीत साजरा होणाऱ्या या महोत्सवामध्ये तोरणमाळच्या निसर्गसौंदर्यासह आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. महाराष्ट्रासह गुजरात व मध्य प्रदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक तोरणमाळला भेट देत असतात. मात्र, आवश्यक सोयीसुविधांच्या अभावामुळे अलीकडच्या काळात पर्यटकांची संख्या काहीशी घटली होती.

हीच बाब लक्षात घेऊन तोरणमाळला पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे स्थान देण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवात आदिवासी लोकनृत्य, पारंपरिक कला, हस्तकला, स्थानिक खाद्यसंस्कृती यांचे सादरीकरण होणार असून यामुळे स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

येत्या ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत दोन दिवसांसाठी हा महोत्सव आयोजित करण्यात येणार असून, पुढील काळात तोरणमाळ महोत्सव दरवर्षी नियमितपणे घेण्याचा प्रशासनाचा मानस आहे. यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून तोरणमाळच्या विकासाला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Home Events Ads Videos News
×
App Icon
Nandurbar IG

Get the App for Latest News

Notifications