22 Aug धमडाई येथे कापुस पिक प्रात्यक्षिक शेतीशाळा कार्यक्रमातुन मार्गदर्शन
तालुका कृषी अधिकारी कार्यालय, नंदुरबार अधिनस्त मंडळ कृषी अधिकारी कार्यालय , धानोरा अन्वये ग्राम-धमडाई येथे राज्य पुरस्कृत एकात्मिक कापुस पिक उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना सन २०२3-२०२4 अंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नंदुरबार. तालुका कृषी अधिकारी, नंदुरबार व मंडळ कृषी अधिकारी, धानोरा. यांच्या मार्गदर्शना खाली कापुस पिक प्रात्यक्षिक मधील शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या प्रशिक्षण कार्यक्रमास सहभागी प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांना शेतीशाळा आयोजना करिता निवड केलेल्या प्रत्यक्ष शेतावर जाऊन कापुस पिकाची वाढ, पिकावरील आढळलेले शत्रु कीड व मित्र कीड यांची ओळख, किडींचे निरीक्षण व सर्वेक्षण घेणे, त्यांचे जीवनक्रम, आर्थिक नुकसान पातळी व त्या अनुषंगाने करावयाचे कीड व्यवस्थापन या विषयी उपस्थित शेतकऱ्यांना गावाचे कृषी सहाय्यक श्रीम. यस.वाय. पवार यांनी मार्गदर्शन केले. पिक वाढीच्या अवस्थे नुसार आवश्यक खत मात्रेचा वापर, पिकास परिपूर्ण वाढीकरिता द्यावयाच्या खतांमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य वापर, त्यांचे फायदे, त्यांचे प्रमाण व द्यावयाची योग्य वेळ या विषयी कृषी पर्यवेक्षक धानोरा-1 श्री. आर. टी. पाटील व कृषि सहाय्यक कोठली श्री. के. के. चौधरी यांनी सखोल मार्गदर्शन केले. या वेळी प्रकल्पात सहभागी असलेल्या शेतकऱ्यांना प्रकल्पा अंतर्गत प्राप्त पिक संरक्षण निविष्टांचे वितरण करण्यात आले.
सदरील शेतीशाळा कार्यक्रमास गावाचे सरपंच श्री. विजय पाडवी , उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य प्रकल्प समूह प्रवर्तक श्री. प्रणील पाटील व गावातील सर्व शेतकरी उपस्थित होते. या शेतीशाळा कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषि सहाय्यक धमडाई श्रीम. यस. वाय. पवार यांनी तर आभार कृषि सहाय्यक कोठली श्री. के. के. चौधरी यांनी केले.
No Comments